पूरनाड चेक पोस्टवरील ‘ते’ वजनकाटे सदोषच : आमदार खडसेंच्या पेन ड्राईव्ह बॉम्बची दखल

Ex-Minister Khadse’s Pen Drive Bombs Take Serious Notice: ‘Te’ Weighing Forks Closed at Purnad Check Post मुक्ताईनगर : महाराष्ट्र-मध्यप्रदेशला जोडणार्‍या तालुक्यातील पूर्णाड आरटीओ चेक पोस्टवरील दररोज 10 ते 12 लाखांची अवैधरीत्या वसुली होत असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी करीत पावसाळी अधिवेशनात याबाबत प्रश्न उपस्थित करीत पेन ड्राईव्हच पुराव्यादाखल देत शासनाचे लक्ष वेधले होते. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून जळगाव येथील वजन काटे विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी चेक पोस्टवरील तोल काट्यांची तपासणी केली असता त्यात वजनात तफावत आढळल्याने नोटीस देवून या काट्यावर वजन करणे बंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईने मात्र आरटीओ प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

खडसेंच्या आरोपाने राज्यात खळबळ
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पावसाळी अधिवेशनात पूर्णाड आरटीओ चेक पोस्टवर प्रति दिवसाला 10 ते 12 लाख रुपयांची माया गोळा केली असल्याची माहिती देत पुराव्यादाखल पेन ड्राईव्ह दिला होता. या अवैध वसुलीमध्ये वरपासून साटेलोटे असल्याचा आरोप करीत शासनाचे लक्ष वेधून कारवाईची मागणी करण्यात आली होती.

‘त्या’ वजनकाट्यात आढळली तफावत
पूरनाड चेकपोस्टवरील त्या काट्यांची जळगाव जिल्ह्यातील अधिकार्‍यांची पथकाने बुधवारी दुपारी तपासणी केल्यानंतर त्यात तफावत आढळल्यानंतर नोटीस देवून या काट्यावर वजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. याप्रसंगी पथकामत अधिकारी जाधव, आनंदा पाटील, खैरनार, राजपूत यांचा समावेश होता. दरम्यान, पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्याशी संपर्क साधला असता कारवाईबाबत काहीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.