पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीची कॅबिनेट बैठक !

0

मुंबई: संपूर्ण राज्यात गेल्या दहा दिवसांपासून संततधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे जनजीवन विष्कळीत झाले आहे. दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरपरिस्थितीची माहिती जाणून घेण्यासाठी तातडीची कॅबिनेट बैठक बोलविली. यावेळी करावयाच्या उपाययोजना आणि मदतीवर चर्चा करण्यात आली.