पूर्णानगरात पाच दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न

0

पिंपरी-चिंचवड : चिंचवड परिसरातील पूर्णानगर परिसरात पाच दुकानांचे शटर उटकटून चोरी करण्याचा अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश मिळाले नाही. या दुकानांमधून कोणताही ऐवज चोरीला न गेल्यामुळे पोलिसात तक्रार देण्यात आलेली नाही. हा प्रकार गुरुवारी रात्री घडला आहे.

चोरटे परतले रिकाम्या हाती
अज्ञात चोरट्यांनी पूर्णानगर परिससरातील पाच दुकानांचे शटर उचकटण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न फसला. त्यामुळे त्यांना रिकाम्या हातानेच परत जावे लागले. ही घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये हॉटेल, आरटीओचे ऑनलाईन भरणा केंद्र व एका रुग्णालयाचा समावेश आहे. या घटनेची माहिती झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. परंतु कोणीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल झालेला नाही. याप्रकरणी केवळ प्राथमिक नोंद झाली आहे. चोरट्यांचा पोलीस शोध घेत आहेत.