मुक्ताईनगर- तालुक्यातील कुंड शिवारातील पूर्णा नदीपात्रात 30 ते 35 वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेने आत्महत्या केली की अन्य कारणातून तिचा मृत्यू झाला ? याबाबत माहिती कळू शकली नाही. याबाबत महेंद्र दिलीप शेरोळे यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बुधवारी सकाळी पूर्णा नदीपात्रात मृतदेह वाहून आल्याची माहिती कळाल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. तपास हवालदार संजय पाटील करीत आहेत.