मुक्ताईनगर- तालुक्यातील डोलारखेडा पूर्णा नदी काठावर वाघाने रानगव्याची शिकार केल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकर्यांमध्ये भीती पसरली आहे. वन्य प्राणी पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पूर्णा नदी पात्राकडे वळत आहे. मंगळवारी उघडकीस आलेल्या घटनेत सोमवारी रात्री वाघाने रानगवा मारला असल्याचा अंदाज आहे. जेथे वाघाने रानगव्याची शिकार केली त्याला लागून शेतकर्यांची शेत जमीन आहे. या भागात गहू काढण्याचे काम सुरू असून शेतकरी या घटनेमुळे पुरते हादरले आहेत. दरम्यान, या घटनेला वन विभागाने दुजोरा दिला असून सायंकाळी सहाच्या सुमारास घटनास्थळी वन विभागाचे पथक दाखल झाले होते.