पूर्ण कर्जमाफी देणे गरजेचे

0

औरंगाबाद । राज्यातील शेतकर्‍यांना राज्य सरकारने पूर्ण कर्जमाफी देणे गरजेचे बनले आहे, असे स्पष्ट मत शरद पवार यांनी औरंगाबाद येथे व्यक्त केले.

देशातल्या 5 मोठ्या बँकांची दोन लाख कोटी पेक्षा जास्त रक्कम बुडीत खात्यामध्ये जात आहे व शेतकर्‍यांचे कर्ज केवळ 60/70 हजार कोटी रुपयांचे आहे. असे असताना या सरकारने शेतकर्‍यांना शंभर टक्के कर्ज माफी द्यायला हवी, असे पवार म्हणाले. जगाच्या बाजारपेठेत शेतकर्‍यांसारखा उत्पादनकर्ता जर उद्ध्वस्त झाला, तर गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल, कारण राज्यातील 80 टक्के शेतकरी 5 एकरपेक्षा कमी मालकीच्या शेतीचे आहेत. एका शेतकर्‍यांच्या कॉफी टेबल बुक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी पवार सोमवारी औरंगाबादेत आले होते. प्रकाशन सोहळ्यात त्यांनी मान्यवर शेतकर्‍यांचा सत्कार केला. या वेळी शेतीविषयक विविध विचार त्यांनी आपल्या भाषणात मांडले. शरद पवारांना पद्मभूषण मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.