पूर्ण वेळ मुख्याधिकार्‍यांअभावी भुसावळच्या विकासाला ‘ब्रेक’

0

मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याकडे पूर्ववत भुसावळचा पदभार सोपवावा : नगरसेवक पिंटू कोठारी यांची जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी

भुसावळ : भुसावळ पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना पूर्ववत कामावर रूजू करून विकासकामांना चालना द्यावा, अशी मागणी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे बुधवारी केली. डहाळे यांच्या काळात शहरात 25 कोटी रुपयांच्या विकासकामांना चालना मिळावा शिवाय त्यांच्या काळात दररोज 250 ते 300 स्वॅब घेतले जात होते शिवाय रुग्ण आढळल्यानंतर परीसर सील करणे, निर्जंतुकीकरण करणे आदी कामे केली जात होती मात्र आता प्रभारी मुख्याधिकारी नेमण्यात आल्याने व आठवड्यातून केवळ दोन दिवस ते शहराला देणार असल्याने मोठी गैरसोय होत आहे.

शहराला पूर्णवेळ मिळावा मुख्याधिकारी
शहरात कोरोना रुग्णांचे वाढलेले प्रमाण तसेच विकासकामांना चालना मिळण्यासाठी शहराला पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे कोठारी यांनी व्यक्त केली आहे. डहाळे यांच्याकडे पूर्ववत भुसावळचा पदभार सोपवावा शिवाय डहाळे यांच्या कामाची पद्धत चुकीची असल्यास अन्य पूर्णवेळ मुख्याधिकारी द्यावा, असेही निवेदनात नमूद आहे.