मुंबई । घाटकोपर पूर्व येथील दत्ता सामंत चौक या ठिकाणी एका तरुणाने महिलेवर चाकूहल्ला केला. आरिफ खान असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पल्लवी कदम ही महिला मंगळवारी संध्याकाळी रुग्णालयात जात असताना आरिफ शेखने त्यांना अडवून त्यांच्या कानाखाली मारले. त्यानंतर त्यांच्या मानेवर चाकूने हल्ला केला तसेच त्यांच्या हातावरही वार केला. पल्लवी यांनी आरडाओरड करताच आरिफ तेथून पळून गेला.
आरिफ हा पल्लवी कदम या राहत असलेल्या विभागातच राहत असल्याचे उघडकीस आले आहेे. जुन्या भांडणाचा राग मनात असल्याने त्याने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. आरिफ हा पहिल्यापासूनच खुनशी प्रवृत्तीचा आहे. अनेकांशी त्याचे भांडण झाले आहे. क्षुल्लक कारणावरून आपल्याबरोबरही त्याने भांडण केले होते. मात्र, त्याचा राग तो अशाप्रकारे चाकूहल्ला करून काढले, असे वाटले नव्हते. वेळीच आरडाओरड केल्याने तो घाबरून पळून गेला. त्यामुळेच जीव वाचला, असे पल्लवी यांनी सांगितले. केवळ पल्लवी यांच्यावरच नव्हे तर यापूर्वी रागाच्या भरात आरिफने विभागातील अनेक जणांवर हल्ला केल्याचे येथील रहिवाशांनी सांगितले.