पूर्वोत्तर राज्यांत भाजपचा डंका

0

आगरतळा/कोहिमा/शिलाँग : पूर्वोत्तरमधील तीन राज्ये मेघालय, नागालॅण्ड आणि त्रिपुरा राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षासाठी खुशखबर देणारे ठरले आहेत. त्रिपुरामध्ये भाजपने डाव्यांचा बालेकिल्ला ध्वस्त केला असून, भाजपने येथे दोनतृतीयांश इतके निर्विवाद बहुमत प्राप्त केले आहे. त्यामुळे या राज्यात हा पक्ष सरकार बनविण्याच्या तयारीत आहे. तर नागालॅण्डमध्येदेखील भाजप आघाडी सरकार बनविण्याच्या तयारीत आहे. तथापि, मेघालयात सत्तास्थापनेच्या भाजपच्या प्रयत्नांना खीळ बसली असून, तेथे काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. तथापि, बहुमतापासून काँग्रेस दूर आहे. पूर्वोत्तर राज्यांतील या शानदार विजयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आनंद व्यक्त केला असून, दोघांनीही हा सरकारच्या विकासनीतीच्या धोरणांचा परिणाम असल्याचे सांगितले आहे.

पक्षीय बलाबल
मेघालय/ एकूण जागा 59
– काँग्रेस : 21
– युडीपी : 8
– भाजप : 2
– एनपीपी : 19
– अन्य : 9

नागालॅण्ड/ एकूण जागा 60
– एनपीएफ : 26
– भाजप : 31
– काँग्रेस : 0
– अन्य : 3

त्रिपुरा/एकूण जागा 59
– सीपीएम : 14
– भाजप : 45
– काँग्रेस : 0
– अन्य : 0