मुंबई:- कामकाजाला सुरुवात झाल्यांनंतर अध्यक्षांनी सर्व सदस्यांना शांत होण्याची विनंती केली. एक चांगली घोषणा करत आहे, असे सांगत त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा वाढदिवस असल्याची घोषणा करून सभागृहाच्या वतीने अभिनंदन करण्याचे आवाहन केले.
यावेळी भाजपच्या सदस्यांनी डेस्क वाजवून अभिनंदन केले. मात्र विरोधी पक्ष आणि शिवसेनेच्या सदस्यांनी याकडे दुर्लक्ष करत आपला गोंधळ आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या घोषणाबाजी सुरूच ठेवल्या. गोंधळ वाढत गेल्याने अवघ्या एका मिनिटात सभागृह स्थगित करावे लागले. यानंतर पृथ्वीराज ‘बाबां’ना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच सदस्यांनी गर्दी केली होती.