पृथ्वीला धोका धूमकेतूचा

0

सूर्याकडून येत असलेला धूमकेतू पृथ्वीच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे. या धूमकेतूपासून पूथ्वीला धोका संभवू शकतो, असे संशोधकांना वाटते. अर्थातच असे काही होणार नाही, असेही काही संशोधकांना वाटते. अनेकांनी या धूमकेतूचा संबंध ‘डूम्स डे’ म्हणजेच प्रलयाशी जोडला आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, सौरमंडळाच्या बाहेरच्या टोकावर बर्फाळ अवकाशीय घटकांचा एक समूह आहे. उर्ट क्लाऊड म्हणजेच विशाल धूमकेतूंचा समूह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीला अशांत करीत आला आहे. हे धूमकेतू सौरमंडळाच्या अंतर्गत भागातून जातात जिथे पृथ्वीचे अस्तित्व आहे. मात्र, खगोलशास्त्रज्ञ मायकल रॅम्पिएनो यांनी म्हटले आहे की असा धूमकेतू भविष्यात पृथ्वीला धडकला तरी मानवजातीला त्याची इतक्यातच काळजी करण्याचे कारण नाही. अशी घटना घडलीच तर ती लाखो वर्षांनंतर घडेल!