पृथ्वीवरचा अंतिम सजीव आठ पायांचा टार्डिग्रेड

0

लंडन – अस्तित्वाची भीती…मोठी उल्का पृथ्वीवर आदळेल किंवा जवळच्याच एका ताऱ्याचा स्फोट होईल आणि सजीव संपतील…वैज्ञानिकांनाही हा प्रश्न पडला होता…सुर्य लुप्त होईपर्यंत पृथ्वीवरील सजीवांचा शेवट झाल्यावरही कोण जिवंत राहील. अनेक प्राण्यांचा शोध घेता घेता तो पूर्ण झाला टार्डिग्रेड या सूक्ष्म प्राण्यापाशी. त्यांनी निर्वाळाच दिला की टार्डिग्रेड हाच सर्वांना निरोप देणार.

टार्डिग्रेड जास्तीत जास्त अर्धा मिलीमीटर इतकाच लांबीला असतो. त्याच्या शारिरीक क्षमता मात्र विस्मयकारक आहेत. अन्नपाण्यावाचून तो ३० वर्षे जीवंत राहू शकतो. १५० डिग्री सेंटिग्रेड इतके तापमान तो लिलया सहन करू शकतो. थंडीने थिजलेले अवकाश ते तर त्याला घरचेच वातावरण वाटते. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतील डॉ. डेव्हीड स्लोन रसभरीत वर्णन करतात. पृथ्वीवरील आघातांनंतर माणसाचे काय होईल अशी शास्त्रज्ञांना चिंता होती. तूर्तास टार्डिग्रेड माणूस आणि अन्य सजीवांपेक्षाही जास्त काळ पृथ्वीवर राहिल असा अंदाज ते व्यक्त करतात.

सायंटिफिक रिपोर्टस या जर्नलमध्ये टार्डिग्रेडबद्दल संशोधन प्रसिद्ध झालेले आहे. उल्कापात, गॅमा किरणांचा स्फोट पृथ्वीवरील जीवन संपवू शकतो. छोटासा प्लुटो ग्रहही कक्षा सोडली तर पृथ्वीवरील समुद्राचे पाणी उकळवू शकतो.

डॉ. राफाएल बटिस्टा मानवी जीवन आणि टार्डिग्रेडचे जीवन यांच्यात सुंदर तुलना करतात. निसर्गातील बदल माणसात मोठे शारिरीक स्थित्यंतर घडवतात. इतका माणूस संवेदनशील आहे. माणसानंतर पृथ्वीवर काही सजीव राहतीलच. टार्डिग्रेड इतके कणखर मात्र कुणीच नाही. असे प्राणी मंगळ आणि अन्य ग्रहांवरही असू शकतात, असे बटिस्टांना वाटतेय.