पृथ्वीवर नैसर्गिक रोगराईचे संकट; भेंडवळचे भाकित

0

बुलढाणा – यंदा चारही महिन्यात पाऊस सर्वसाधारण आणि चांगल्या स्वरुपात राहिल.      अतिवृष्टीमुळे नासाडीही होईल. पृथ्वीवर नैसर्गिक रोगराईचे संकट येईल आणि देशाची आर्थिक स्थितीही कमकुवत होईल असा अंदाज भेंडवळ भाकितात नोंदवण्यात आला आहे. राजा कायम आहे, मात्र आर्थिक स्थिती खालावल्याने राजावरचा तणाव वाढेल. परकियांची घुसखोरी होईल आणि संरक्षण खात्यावर ताण राहिल. तसेच त्यामुळे त्रास सहन करावा लागेल असंही या भाकितात म्हटले आहे. सारंगधर महाराज यांनी हे भाकित वर्तवले आहे.

भेंडवळची ३५० वर्षांची भविष्य परंपरा या वर्षी करोना संकटामुळे खंडीत होईल का? असे वाटत होते. मात्र तसे न घडता भेंडवळची भविष्य परंपरा कायम राहिली आहे. यंदा ज्वारी, तूर, गहू, कपाशी, सोयाबीन यांचे पिक चांगले येईल. पहिल्या महिन्यात पेरण्या केल्या जातील मात्र चारा टंचाई भासेल. जमिनील पाण्याची पातळी वाढेल. पाऊस चांगला होईल, असे भाकित वर्तविण्यात आले आहे.