अमळनेर । अमळनेर चोपडा रोडवरील देवगाव देवळी फाट्याजवळ अमळनेरहुन नगावकडे जाणार्या पॅजो रिक्षाला समोरून येणार्या अज्ञात ट्रॅक्टरने धडक दिल्याने 1 जण जागीच ठार तर 8 जण जखमी झाल्याची घटना सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडली. अमळनेरहुन नगाव गावातीलच पॅजो रिक्षा प्रवासी घेऊन नगाव कडे जात असताना समोरून येणार्या अज्ञात लाल रंगाच्या ट्रॅक्टरचा हुक अडकुन धडक बसल्याने केतन कैलास पाटील (22, रा.गडखांब) याला गुप्तांग व मांडीला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर केवळबाई निंबा पाटील यांच्या छतीला व पोटाला मार लागला. सारलाबाई राजू शिंपी यांचा हात फ्रॅक्चर झाला. भूषण वसंत वारुळे 24 याच्या डोळ्याला हाताला मार लागला असून त्यांना नर्मदा फौंडेशन मध्ये दाखल केले असून डॉ.अनिल शिंदे, डॉ.संदीप जोशी यांनी उपचार केले. इतर जखमी वाल्मिक दगडू पाटील, आधार संभाजी पाटील जनाबाई ताराचंद पाटील, अर्जुन गिरीधर कुंभार, कमलाबाई कुंभार यांच्यावर उपचार करून त्यांना घरी रवाना करण्यात आले. केतन याचे शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पीएसआय गोकुळ पाटील, पो.ना. विजय साळुंखे, हे.कॉ.प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. आमदार स्मिता वाघ, बाजार समिती सभापती उदय वाघ, पं.स.सदस्य निवृत्ती बागुल, तालुका काँग्रेस अध्यक्ष गोकुळ पाटील, किरण गोसावी, प्रवीण गोसावी किरण बागुल आदींनी रुग्णालयात भेट देऊन सहकार्य केले.