नवी दिल्ली : केंद्रिय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सन 2017-18 च्या वित्तीय विधेयकात कर प्रणालीमध्ये सुधारणा करीत आधारकार्ड हे पॅनकार्डला लिंक करणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सरकारने कर भरणार्यासाठी येत्या एक जुलैपासून पॅन कार्ड नंबर आधार कार्डला जोडणे अनिवार्य केले आहे. आता पॅन कार्ड आणि आधार लिंक करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. आयकर नियमांमध्ये दुरुस्ती करून केंद्र सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न नियमांच्या बदलासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. सरकारने पॅनसाठी अर्ज करताना 12 अंकी बायोमेट्रिक या नामांकन आयडी देणे अनिवार्य केले आहे. देशात सुमारे 2 कोटी करदात्यांनी आतापर्यंत आधारकार्ड हे पॅनकार्डला लिंक केले आहे