नवी दिल्ली । पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी आणखी चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत आहे. आयकर विभागाने गुरूवारी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले. पॅनकार्ड आधारशी लिंक करण्याचा गुरूवारी शेवटचा होता. परंतु, केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. पॅन आणि आधार लिंक न केल्यास पॅनकार्ड रद्द होण्याची शक्यता आहे. रद्द झालेल्या पॅनकार्ड नंबरने इन्कम टॅक्स रिटर्न दाखल केला, तर तोही मान्य होणार नाही.