पॅराऑलिम्पियन देवेंद्र झझारिया ठाण्यात क्रांती दौडसाठी येणार

0

ठाणे। आपण सारे आयोजित पंचरंगी आठव्या रन फॉर चले जाव या क्रांती दौडसाठी मिळालेला प्रतिसाद लक्षात घेऊन या स्पर्धेच्या प्रवेशिका स्वीकारण्याची मुदत वाढवण्यात आली आहे.

आता या प्रवेशिका 1 ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येतील. विविध आठ गटामध्ये 6 ऑगस्ट रोजी होणार्‍या या शर्यतीतील धावपटूना प्रोत्साहन देण्यासाठी रिओ पॅरा ऑलिम्पिकमधील भालाफेकीतील सुवर्णपदक विजेता आणि पद्मश्री किताबाचे मानकरी ठरलेले पहिले पॅराऑलिम्पियन देवेंद्र झझारिया उपस्थित राहणार आहे. याशिवाय माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाणदेखील यावेळी हजर राहणार आहेत. स्पर्धेच्या प्रवेशिका डेकेथ्लॉन, हायपर सिटी मॉल, घोडबंदररोड येथे स्वीकारल्या जातील. खेळाडूना स्पर्धेच्या टायमिंग चीप, स्पर्धक क्रमांकही डेकेथ्लॉन मधूनच मिळणार आहेत. स्पर्धेची माहिती ुुु.रररिपीरीश.लेा संकेतस्थळावर उपलब्ध आहे.