पॅरिसमध्ये इमारतीला भीषण आग; 7 जणांचा मृत्यू

0

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये मंगळवारी सकाळी एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. या आगीत 28 जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आठ मजली इमारतीच्या सातव्या आणि आठव्या मजल्यावरील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेत अग्निशमन विभागाचेही 3 कर्मचारी जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. पण या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.