पॅरिसमध्ये लेटर बॉम्बचा स्फोट

0

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यालयात लेटर बॉम्बचा सौम्य स्फोट झाला. तर दक्षिण फ्रान्समधील एका शाळेत बंदूकधारी अतिरेक्यांनी हल्ला केला. अतिरेक्यांनी शाळेत केलेल्या गोळीबारात अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनांमुळे संपुर्ण फ्रान्समध्ये हायअलर्ट घोषित करण्यात आला आहे.

आयएमएफचा कर्मचारी जखमी
दक्षिण फ्रान्सच्या ग्रासे परिसरातील हायस्कुलमध्ये बंदूकधारी अतिरेक्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात अनेकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर एका संशयीताला पकडण्यात आले तर एकजण पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. या दोन घटनांनंतर संपुर्ण फ्रान्समध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला. तत्पुर्वी पॅरिसमधील आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यालयात लेटर बॉम्बचा स्फोट झाला. स्फोटकं असलेला लिफाफा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी कार्यालयातील कर्मचार्‍याने उघडताच स्फोट झाला. या स्फोटात तो कर्मचारी जखमी झाला आहे.

अतिरेक्यांच्या निशाण्यावर फ्रान्स
यापुर्वी नोव्हेंबर 2015 मध्ये पॅरिसमध्ये मोठा अतिरेकी हल्ला झाला होता. 13 नोव्हेंबरच्या सायंकाळी पॅरिस आणि पॅरिसच्या उत्तर परिसरातील सेंट डेनिस येथे साखळी बॉम्बस्फोट अतिरेक्यांनी घडवून आणले होते. या अतिरेकी हल्ल्यात 129 लोक मरण पावले होते. गुरूवारी घडलेल्या दोन घटनांमुळे पुन्हा एकदा फ्रान्स हादरले आहे.