अमळनेर: पॅरोलवर असलेला आरोपी राकेश चव्हाण याचा काल रात्री खून करण्यात आला आहे. दरम्यान खून प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे. ही घटना घडल्यानंतर कादर शेख फकीर, गुलाम कादर अब्दुल रशीद पिंजारी,शरीफ मोहियोद्दीन मेहतर,इम्रान शेख उस्मान अशा 4 जणांना अटक केली असून या खुनाच्या घटनेत अजून काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे. अमळनेर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी तपास सुरू केला आहे.
हा खून शहरातील ख्वाजानगर भागात झाला. या घटनेने
शहरात तणावाचे वातावरण आहे.