पॅसेंजरवर दगडफेक केल्याने सहचालक जखमी

0
भुसावळ :- 51153 मुंबई-भुसावळ पॅसेंजरच्या इंजिनावर अज्ञात मुलांनी दगडफेक केल्याने इंजिनाचा दर्शनी भागाचा काच फुटून सहचालक जखमी झाल्याची घटना चाळीसगाव रेल्वे स्थानकावर शनिवारी दुपारी 1.53 वाजता घडली. जखमी चालकावर भुसावळात आल्यानंतर रेल्वे रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान, दगडफेक करणार्‍या बालकांना चाळीसगावातील रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेत त्यांच्या पालकांना बोलावून कडक शब्दात समज देऊन सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.