पॅसेंजर भरण्यावरून रिक्षाचालकाला मारहाण

0
चिंचवड : रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्याच्या कारणावरून तीन जणांनी मिळून रिक्षाचालक तरुणाला मारहाण केली. यामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ब्लक शर्प आर्क वेअडोरा सर्व्हिसेस कंपनीसमोर घडली. समीर समद सिद्दीकी (वय 20, रा. महात्मा फुलेनगर झोपडपट्टी, मोहननगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विकास बोटे, संजय करडे, महादेव (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर रिक्षाचालक आहेत. रिक्षामध्ये पॅसेंजर भरण्याच्या कारणावरून समीर आणि आरोपी यांच्यामध्ये वाद झाला. आरोपींनी समीर यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एका आरोपीने समीर यांच्या डोक्यात कु-हाडीसारख्या हत्याराने मारले. यामध्ये समीर गंभीर जखमी झाले. या भांडणात समीर यांचा मोबाईल फोन, पाकीट आणि महत्वाची कागदपत्रे गहाळ झाली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.