मुंबई : पेटीएम ई कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचा पेटीएम मॉल, आपल्या मंचावरील ग्राहकांचा विश्वास वाढवण्यासाठी आपल्या विक्रेता ऑनबोर्डिंग प्रक्रियेमध्ये सुधारणा करत आहे. कंपनीने विक्रेत्यांसाठी ब्रँड प्रमाणीकरण पत्र सादर करणे अनिवार्य केले आहे. या मंचावर उत्पादने नोंदवण्यासाठी, विक्रेत्यांची गुणवत्ता आणि सेवेची कठोर तपासणी केली जाईल ज्यामध्ये त्यांचा नोंदणी क्रमांक, दुकानाचे स्थान आणि फोटोसह त्यांचे जीएसटीआयएनही समाविष्ट असेल. या प्रक्रियेमुळे संभाव्य बनावट विक्रेते साइनइन करून मंचाशी संबंधित ग्राहकांच्या अनुभवाला दुष्प्रभावित करू शकणार नाहीत. नवीन मार्गदर्शक तत्वांचा परिणाम म्हणून, मंचावरून त्या 85,000 हून अधिक विक्रेत्यांना आणि त्यांच्या उत्पादनांना हटविण्यात आले आहे जे कंपनीची कठोर गुणवत्ता मानके पूर्ण करण्यात अपयशी ठरले होते.
ग्राहकांना ऑर्डर करण्यासाठी क्यूआरकोडची सुविधा
या धोरणांतर्गत कंपनी प्रसिद्ध विक्रेते आणि ब्रँडसोबत काम करणे सुरु ठेवेल, त्यांच्या कॅटलॉगला ऑनलाईन आणेल, यामुळे त्यांची उत्पादने सहजरित्या शोधली किंवा खरेदी केली जाऊ शकतील. सोबतच दुकानांना पेटीएम मॉल क्यूआरकोड सोल्यूशन दिले जाईल यामुळे ग्राहक उत्पादने पाहून आपली ऑर्डर देऊ शकतील. यातून स्थानिक विक्रेते आपले सामान ऑनलाईन उपलब्ध करून आपली विक्री आणि त्यातून होणार्या उत्पन्नामध्ये वृद्धी करू शकतील. सुधारित उपाय योजनांसह, पेटीएम मॉल ब्रँड आणि विक्रेत्यांना आपल्या मंचावर विकल्या जाणार्या उत्पादनांसाठी परतावा, विनिमय आणि रिफंडचे धोरण प्रस्थापित करण्यामध्ये सक्षम बनवेल. या मंचावर दुकानदार आणि ब्रँडच्या विक्रेत्यांना लॉजिस्टिक पार्टनरच्या मदतीने संपूर्ण लॉजिस्टिक समर्थन प्रदान केले जाईल.