पेटीएमने लाँच केले फूड वॉलेट

0

नवी दिल्ली । पेटीएमने आता फूड वॉलेट ही सेवा सुरू केली आहे. यामुळे कॉर्पोरेट कर्मचार्‍यांना कर-बचतीची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे कंपन्या सरकारद्वारा मान्य कर सवलतीच्या चौकटीत राहून आपल्या कर्मचार्‍यांना खाद्यान्न भत्ता देऊ शकणार आहेत. फूड वॉलेट पेटीएम ऍपमध्ये उपलब्ध असेल आणि कर्मचार्‍यांना मिळणारा खाद्यान्न भत्ता हा डिजिटल असणार आहे. यामुळे तो संपण्याची अथवा त्याचे नुकसान होण्याची जोखीम दूर होणार आहे.

पेटीएमच्या फूड वॉलेटचा जबरदस्त इंटरफेस आहे, ज्यात कर्मचारी पासबुकमध्ये वास्तविक बॅलेन्स पाहू शकतील. तसंच ऍपवरील नियरबाय या ऑप्शनमधून अगदी जवळचे फूड आऊटलेट शोधू शकणार आहेत. या वॉलेटचा उपयोग कचेरीच्या कॅफेटेरियामध्ये तसेच अनेक ऑनलाइन आणि अगदी लहानशा दुकानापासून प्रत्यक्ष व्यापार्‍याकडे करता येणार आहे. यामध्ये केएफसी, बर्गर किंग, झोमॅटो, पिझ्झा हट, कॅफे कॉफी डे, बिग बझार आदींचा समावेश आहे.

फूड वॉलेटमध्ये ग्राहकांना विशेष सवलती आणि कॅशबॅक यासारखे बेनेफीट देखील मिळणार आहेत. भारताचा 25 हजार कोटींचा कर-मुक्त भत्ता बाजार दर वर्षी 12 दशलक्ष वेतन रिटर्न दाखल झाल्याचे पाहतो. या अनोख्या उत्पादनानंतर, पेटीएम अशा सहा दशलक्ष कर्मचार्यांच्या जीवनावर परिणाम करणार आहे, जे दरवर्षी आपल्या फूड व्हाऊचरचा दावा दाखल करण्यासाठी खटपट करतात.