पेट्रोल,डिझेलसह सिलिंडर महागले

0

नवी दिल्ली : कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सवलतींचा वर्षाव केल्यानंतर आज केंद्र सरकारने सबसिडी असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ केली आहे. आतापर्यंत सबसिडी असलेले सिलिंडर (14.2 किलोग्रॅम)चे दर 432.71 रुपये असे होते. दोन रुपयाची वाढ झाल्यामुळे आता याची किंमत 434.71 रुपये होईल. पेट्रोल 1.29 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 97 पैशांनी महागले आहे. आज मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू होतील. याजसोबत जेट फ्यूलच्या दरामध्ये वाढ करण्यात आल्यामुळे विमान प्रवास महाग होऊ शकतो.

सलग आठव्यांदा वाढ
गेल्या जुलैपासून सबसिडी असलेल्या सिलिंडरच्या किंमतीमध्ये 8 वेळेस वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी एक डिसेंबरला 2.07 रुपये प्रति सिलिंडर वाढवण्यात आले होते. याचसोबत एअर टरबाइन फ्यूल म्हणजे विमान इंधनामध्ये मोठी वाढ 8.6% टक्क्यांनी वाढ केली आहे. एटीएफ फ्यूलची दिल्लीमध्ये किंमत 4161 रुपए प्रति किलोलीटर (1000 लीटर) वाढून 52540.63 रुपए प्रति किलोलीटर झाली आहे.

इंधनातही दरवाढ
सर्वसामान्यांना आता पेट्रोल, डिझेल दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. पेट्रोल 1.29 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 97 पैशांनी महागले आहे. आज मध्यरात्रीपासूनच नवे दर लागू होतील. पंधरा दिवसांपूर्वीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. पेट्रोल प्रतिलिटर 2.21 रुपयांनी तर डिझेल प्रतिलिटर 1.79 रुपयांनी महागले होते. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर नियंत्रणमुक्त केले आहेत. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीच्या आधारे दर 15 दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दराचा आढावा घेतात.

एसबीआयच्या व्याजात कपात
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बँकांना सर्वसमावेशक धोरण राबविण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत स्टेट बँकेने दरकपात जाहीर केली आहे. बँकेचा एका दिवसासाठीचा ’एमसीएलआर’ दर 8.65 टक्क्यांवरुन 7.75 टक्के झाले आहे तर तीन वर्षे मुदतीच्या कर्जाचा दर 9.05 टक्क्यांवरुन 8.15 टक्के झाला आहे. केंद्र सरकारने पाचशे व हजारांच्या नोटा बाद केल्यानंतर एसबीआयकडे जुन्या नोटांच्या स्वरुपात 14.9 लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. यामुळे बँका कर्जदरात कपात करतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात रेपो दरात 1.75 टक्क्यांची कपात केली आहे.