पेट्रोलने गाठला पाच वर्षांमधील उच्चांक 

0

नवी दिल्ली । पेट्रोल आणि डिझेलचे भाव सातत्याने वाढत असून, पेट्रोलने गेल्या 5 वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 74 रुपये 8 पैसे प्रतिलिटर तर डिझेल 65 रुपये 31 पैसे प्रतिलिटरपर्यंत पोहेचला आहे. पेट्रोलने सप्टेंबर 2014 नंतरचा हा सर्वाधिक उच्चांक गाठला आहे. राजधानीत याआधी डिझेल एवढे महाग कधीही झाले नव्हते. मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली असून, सर्वसामान्यांच्या खिशाला याची झळ बसत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे भाव हे सातत्याने वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची किंमत जशी वाढते, तशाच प्रकारे पेट्रोल आणि डिझेलही महाग होत जाते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलचा दर 71.85 अमेरिकन डॉलर प्रति बॅरल इतका आहे.