पेट्रोलपंप ते देशशिरवाडे रस्ता मार्चपर्यंत पूर्ण होणार

0

पिंपळनेर । येथील सटाणा रस्त्यावरील पेट्रोल पंप ते देशशिरवाडे या अंत्यत दूरवस्था झालेल्या दोन कि.मी.रस्त्याच्या बांधकामासाठीचा प्रस्ताव करण्याच्या सूचना संबधित विभागाला देऊन येत्या मार्चपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन आमदार डी.एस अहिरे यांनी अनौपचारीक बोलतांना ग्रामस्थांना दिले. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप बधान, सतीश पाटील, श्यामकांत कोठावदे, किशोर बधान, योगेश नेरकर, योगेश बधान आदी पदाधिकारी उपस्थित होते. रस्त्याचे भाग्य उजाडणार असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. रस्त्यावर वाटसरूना वाट ही शिल्लक राहिली नाही. रस्त्याची वाट लागली असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दोन वर्षापासून रस्त्याची होती मागणी
आमदार डी.एस.अहिरे यांनी सांगितले की, रस्त्याच्या विकासासाठी लागणारा निधी मंजूर करून रस्ता नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले. सटाणा पिंपळनेर राज्य मार्गावरील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या हॉटेल सरभी ते देशशिरवाडे या रस्त्याची गेल्या दोन वर्षापासून अतिशय चाळण झाली आहे. हा रस्ता शेतकरी वर्गासाठी खूप उपयुक्त आहे. तर सेयान इंटरनॅशनल स्कुलमध्ये जाण्यासाठी ही महत्त्वाचा आहे. प्रचंड खड्डे पडलेले आहेत. पूर्ण रस्ता हा खाचखळग्यांनी भरलेला आहे. पुढे हा रस्ता चिकसे देगाव दिघावे उंभरे उंभर्टीकडे जातो. वाहनधारकाना मोठा धोका पत्करून वाहन चालवावे लागते. या अतिशय महत्वाच्या रस्याच्या विकासाकडे कोणत्याही बांधकाम विभागाचे लक्ष नाही. अखेर आमदार अहिरे यांच्याकडे हा विषय मांडावा लागला.