पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

0

मुंबई: पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरामुळे देशात लोकांमध्ये राग आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढण्याचे प्रकार हे नेहमीच सुरू असते. आता पेट्रोलच्या दरात 20 पैशांनी तर डिझेलच्या दरात 21 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्‍लीमध्ये डिझेल 71.55 रुपये प्रति लीटर झालं आहे. बुधवारी दिल्लीमध्ये डिझेल 71.34 रुपये प्रति लीटर होतं.

मुंबईमध्ये पेट्रोल 86.91 रुपये प्रति लीटर आहे. 19 पैशांनी वाढ पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये डिझेल 75.96 रुपये लीटर विकलं जात आहे. बुधवारी डिझेल 75.74 रुपये प्रति लीटर होतं. कोलकातामध्ये पेट्रोल 82.41 रुपये प्रति लीटर तर डिझेल 74.40 रुपये प्रति लीटर आहे.