नवी दिल्ली: एकीकडे कोरोना विषाणूमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत आहे. मात्र केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील उत्पादन शुल्कात ३ रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. इंधनाचे दर वाढणार असल्याने वाहतूक खर्चात वाढ होणार आहे. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने इंधनावरील उत्पादन शुल्क ३ रुपयांनी वाढवण्यात आल्यामुळे सरकारला जनतेचा रोष सहन करावा लागू शकतो. ही परिस्थिती टाळण्यासाठी सरकार पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्याची शक्यता धूसर असल्याचे क्षेत्रातल्या तज्ञाकडून सांगण्यात येत आहे. त्याऐवजी येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल, डिझेलचे दर कमी होऊनही सरकार इंधनाचे दर घटवणार नाही.
गेल्या सव्वादोन महिन्यांत पेट्रोल ५ रुपयांनी कमी झाले आहे. २७ फेब्रुवारीपासून ही घट सुरू आहे. जरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर ३० टकक्यांनी कमी झालेले असले तरीही भारतात हे दर एवढ्यात कमी होण्याची शक्यता नाही. कारण पेट्रोल डिझेलचे दर दररोज ठरवताना एक नियम केलेला आहे. यामध्ये ऑईल कंपन्या १५ दिवसांचा बेंचमार्क रेटचा ताळमेळ ठेवत दर ठरवतात. यामुळे हे दर कच्चे तेल आणि डॉलरची किंमत यावरील चढ-उतारावर अवलंबून असते.