पेट्रोल-डिझेल दरकपातीला दिवाळीचा मुहूर्त

0

पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांचे पुन्हा आश्वासन

अमृतसर : पुढील महिन्यात दिवाळीपर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे, असे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराने उच्चांक गाठल्याने देशभरातच संतापाचे वातावरण आहे. दररोज पेट्रोलचे दर निश्चित करण्याच्या निर्णयावर विरोधकांनीही सरकारला धारेवर धरल्याने धमेंद्र प्रधान यांनी हे आश्वासन दिले आहे.

पेट्रोलियम उत्पादनांवरही लवकरच जीएसटी
पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान हे अमृतसरच्या दौर्‍यावर होते. येथे त्यांनी दिवाळीपर्यंत इंधनाच्या दरात कपात होईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. अमेरिकेत आलेल्या पुरामुळे तेलाच्या उत्पादनात 13 टक्क्यांनी घट झाल्याने रिफायनरी तेलाचे भाव वाढले आहेत, असेही ते म्हणाले. तेल कंपन्यांच्या नफ्याविषयी प्रधान यांना विचारले असता ते म्हणाले, ते सरकारद्वारे निश्चित केले जाते. पेट्रोलियम उत्पादनांवरही लवकरच जीएसटी लावण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांनाच जास्त नफा होईल. धमेंद्र प्रधान यांना अलिकडेच कॅबिनेट मंत्र्यांचा दर्जा मिळाला असून, त्यांच्याकडे कौशल्य विकास आणि उद्योजकता खात्याचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.