पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आता घरगुती गॅसचा भडका

0

नवी दिल्ली : इंधन दरवाढीमुळे देशातील सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. नागरिकांना काही दिलासा मिळण्याची चिन्हे नाहीत. दिल्लीत अनुदानित सिलेंडरच्या किमतीत २.८९ रुपयांनी वाढ झाली आहे.

दिल्लीत ऑक्टोबर महिन्यात विना अनुदानित सिलेंडरच्या दरांमध्ये ५९ रुपयांनी वाढ झाली आहे. इंडियन ऑयलच यावर म्हणणं आहे, की सिलेंडरच्या किमतीत ही वाढ प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील वाढत्या किमती आणि परकीय चलन विनिमय दरातील उतार-चढाव मुळे होतं असते. प्रति सिलेंडरचे दर २.८९ रुपयांनी वाढण्यास जीएसटीही प्रमुख कारण असल्याचे कंपनीने सांगितले. ऑक्टोबरमध्ये ग्राहकांच्या खात्यात ३७६.६० रुपये प्रति सिलेंडर अनुदान जमा करण्यात येणार आहे. सप्टेंबर २०१८ मध्ये हे अनुदान ३२०.४९ रुपये होते.

दिल्ली – ४४.३० रुपये (प्रति किलो)
नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद – ५१.२५ (प्रति किलो)
रेवाडी – ५४.०५ प्रति किलो

विमान इंधनाचे (एटीएफ) देशांतर्गत दर २६५० रूपये प्रति किलोलीटर वाढले आहेत. त्यामुळे हवाई प्रवासही महागला आहे. नवीन किमती या रविवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.