पेट्रोल, डिझेल दरवाढ म्हणजे भाजपची संघटीत सरकारी लुट -भापकर

0

पिंपरी-चिंचवड :– केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरामध्ये भयंकर वाढ केली आहे. देशामध्ये सर्वांत महाग पेट्रोल महाराष्ट्रात दिले जात आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढ म्हणजे भाजपची संघटीत सरकारी लुट असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

महंगाईमुळे जनता त्रस्त
भापकर एका पत्रकात म्हटले आहे की, भाजपने लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महागाई भ्रष्टाचाराचे मुख्य मुद्दे उपस्थित करून, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्टीय अध्यक्ष अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह सर्व नेत्यांनी नाना प्रकारच्या आश्वासनांची बरसात केली. त्याला जनतेने भुलून सत्तेसाठीचे धो धो बहुमत भाजपला दिले मोदी सरकारच्या गेल्या चार वर्षाच्या काळात ‘त्या बाता एकेक करीत थापा’ असल्याचे उघडकीस येत आहे. पौर्णिमेच्या चंद्राच्या कलेकलेने पेट्रोल व डिझेल दरवाढ मागील आठ दिवसांपासून वाढवली जात आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता त्रस्त आहे. सप्टेंबर 2013 मध्ये आंतरराष्टीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतीबॅरल 109.45 डॉलर होती. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रती लिटर दिल्लीमध्ये 76 रपरेय 06 पैसे, कोलकत्ता येथे 83 रुपये 63 पैसे आणि मुंबई, पुणे 83 रपये 62 पैसे असे एक लिटर पेट्रोलचे भाव होते. त्यावेळी त्यावेळच्या सरकार विरोधात भाजपचे सर्व नेते कार्यकर्त्यांनी आकाश पातळ एक करून थयथयाट केला होता.