नवी दिल्ली- देशातील नागरिकांसमोर पेट्रोल आणि डीझेलची वाढती किंमत मोठ्या चिंतेची बाब आहे. पेट्रोलने नव्वदी गाठली असल्याने सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात महागाईचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पेट्रोल- डीझेलला जीएसटीच्या कक्षेत आणावे अशी मागणी केली आहे. ट्वीटरवरून राहुल गांधी यांनी मोदींना पेट्रोल-डीझेलला जीएसटीच्या कक्षेत आणून सामान्य जनतेला दिलासा द्यावे अशी मागणी केली आहे.
आदरणीय श्री मोदीजी, आम जनता पेट्रोल-डीजल के आसमान छूते दामों से बहुत ज्यादा परेशान है.
आप कृपया पेट्रोल-डीजल को GST के दायरे में ले आइए।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 5, 2018
काल केंद्र सरकारने पेट्रोलच्या किंमती २.५ रुपयाने कमी केल्या आहे. महाराष्ट्र सरकारने देखील २.५ रुपये पेट्रोल कमी केल्याने महाराष्ट्रात पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त झाले आहे.