नवी दिल्ली | देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींबाबत पर्यटन मंत्री अल्फोन्से कन्नाथनम यांनी देशवासियांच्या जखमांवर मीठ चोळले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दर घसरत असताना दर आठवड्याला वाढणाऱ्या पेट्रोल, डीझेलच्या दरांमुळे भारतीय जनतेत कमालीचा असंतोष पसरला आहे. त्यात मोदींचा मंत्री म्हणतोय की, पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणारे लोक उपासमारीने मरत नाहीत. पेट्रोलियम उत्पादनांवरील करातून मिळणारे पैसे पासून गरिबांच्या कल्याणासाठी वापरले जातील. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निर्णय विचारपूर्वक घेतला गेल्याचा दावा कन्नाथनम यांनी केला आहे.
कन्नाथनम म्हणाले की, आम्ही गरीबांच्या कल्याणासाठी सत्तेत आहोत. गावांमध्ये वीज यावी, घरे, शौचालये बांधली जावीत, असा आमचा प्रयत्न आहे. यासाठी खूप खर्च लागेल. हा पैसा येणार कुठून? म्हणूनच आम्ही अशा लोकांवर कर लादणार आहोत की जे हे कराचे पैसे देऊ शकतात.
पेट्रोल कोण खरेदी करतो? ज्याच्याकडे कार, बाईक आहे तोच ना! मग अशी माणसे नक्कीच भुकेकंगाल तर नसतील. नक्कीच भुकेले जाणार नाही. ज्यांची ऐपत आहे त्यांना हे कार द्यावेच लागतील, देशहितासाठी आणि गरीब जनतेच्या कल्याणासाठी!! पेट्रोल आणि डिझेल खरेदी करणाऱ्यांना कर भरावाच लागेल. याआधीच्या सरकारला जो पैसा मिळाला तो सर्व मंत्र्यांनी चोरला, खाल्ला. आधीच्या सत्ताधाऱ्यांनी हा सर्व पैसा पचविला. त्यामुळे तुम्हाला आज देशासाठी कार द्यावाच लागेल.
– अल्फोन्से कन्नाथनम, केंद्रीय पर्यटन मंत्री