नवापुर । पेट्रोल,डिझेल,व गॅसचे सततची दरवाढ कमी होणे बाबतचे निवेदन तहसीलदारांना नवापुर तालुका कोँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले. हे निवेदन नायबतहसिलदार बी.एस.पावरा यांनी स्विकारले. यावेळी तालुक्यातील कॉग्रसे कार्यकर्त तहसिल कार्यालयात मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशामध्ये दररोज इंधनाचे दरवाढ वाढविण्याची पध्दत सुरु झाल्यापासुन खास करुन महाराष्ट्रात इंधनाचे दर अभुतपुर्व भडकले आहेत. यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. रोज भाव वाढतच आहे हेच का अच्छे दिन दाखवले जात आहे असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे.
दरवाढीने जनतेत रोष
भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढलेले आहे. जी.एस.टीमुळे किराणा तसेच प्रत्येक वस्तुंवर जादाकर लावल्यामुळे सामान्य ग्राहक प्रचंड लुबाडला जात आहे. यातच दररोज पेट्रोल,डिझेल,व गॅसचे दरात प्रचंड वाढ होत असल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात प्रचंड रोष निर्माण झालेला आहे. त्याचा उद्रेक होण्याची वाट केंद्र व राज्यसरकारने पाहु नये. उद्योगपतींना पोसणार्या भाजप सरकारला शेती व सामान्य जनतेचे दु:ख दिसत नाही. हे सामान्य जनतेचे दुर्देव आहे. तरी महोदयांना निवेदन की केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल,डिझेल,व गॅसचा दरात सतत होणारी वाढ ताबडतोब थांबवावी व सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवुन दयावा अन्यथा सर्व सामान्य गरीब जनतेच्या उद्रेकाला सामोरे जाण्यासाठी सरकारने तयार रहावे व होणा-या तीव्र परिणामास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे निवेदना मध्ये म्हटले आहे
दुष्काळी परिस्थिती नसतांना उपकराची वसुली
महाराष्ट्र राज्यामध्ये सन 2015 मध्ये दुष्काळी परिस्थिती असतांना राज्य सरकारने पेट्रोलियम पदार्थावर उपकर लावला होता. यावर्षी काही तालुके वगळता राज्यामध्ये चांगला पाऊस झाल्याने महाराष्ट्र राज्यात दुष्काळाची परिस्थिती नाही. तरी दुष्काळाच्या नावाखाली राज्य सरकार पेट्रोलियम पदार्थावर उपकर वसुल केला जात आहे. हे ग्राहकावरील अन्यायकारक आहे. शेजारील राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात 10 ते 11 रुपये अधिक आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्या भाजपा सरकारने जनतेच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यांनी दिले निवेदन
निवेदनावर काँग्रेस तालुकाध्यक्ष तथा पं.स उपसभापती दिलीप गावीत,जि.प सदस्य रतनजी गावीत, कॉग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आर.सी.गावीत,पं.स सदस्य जालमसिंग गावीत,कुथ्या गावीत,विकास गावीत,वेच्या गावीत,वसंत वसावे,नकुल वळवी,योहान वळवी,रोबेन चौधरी,बाळु गावीत,बकाराम गावीत,हर्षल गावीत,सुभाष गावीत,अर्जुन गावीत,धिमु वळवी,रमेश वळवी,दिलीप वसावे,मोहन वसावे,राजेंद्र वसावे,रवी गावीत,विनायक गावीत,सुनिल गावीत,आदीचा सह्या आहेत.