रावेर । पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ रावेर येथे काँग्रेसच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दुपारी दोन वाजता शहरातील काँग्रेस कार्यालयाजवळून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. पेट्रोल दरवाढीविरोधात यावेळी घोषणा देण्यात आल्या. यावेळी तहसिलदार कार्यालयावर मोर्चा आणून नायब तहसीदार कविता देशमुख यांना निवेदन देण्यात आले.
यांनी घेतला सहभाग
मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार शिरिष चौधरी, माजी नगराध्यक्ष हरिष गणवानी, महाजन, राजीव पाटील, अॅड. योगेश गजरे, यशवंत धनके, पंकज वाघ, संजय महाजन, काझी साहेब, गयास महाजन, दिरूबाब तडवी, भूषण चौधरी, जितेंद्र पाटील, आशीष गांगवे, नीलेश तायडे, संतोष पाटील, भरत कुवर, धनराज पाटील, याकूब मेंबर, महेश लोखंडे, श्रीकांत सपकाळे, जर्नादन पाचपांडे, रायमळे गुरुजी आदी कॉग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी अनेकांनी उपस्थितीतांनी मोर्चाला मार्गदर्शन केले.