पेट्रोल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे ‘अभिनव’ आंदोलन

0
बैलगाडीत मोटारसायकल ठेवून काढला मोर्चा
तळेगाव दाभाडे : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व खड्डेमय रस्ते यांचा विरोध करण्यासाठी राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात वडगाव मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अभिनव पद्धतीने आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाई विरोधातत बैलगाडीमध्ये मोटारसायकल ठेवून वडगाव मावळ येथे मोर्चा काढण्यात आला. पोटोबा महाराज मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयाजवळ सभा घेऊन मोर्चाची समाप्ती झाली. केंद्रात व राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आल्यापासून महागाईने कळस गाठला असून जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. त्वरित भाववाढ रद्द करावी रस्त्यांवरील खड्डे दुरुस्त करावेत अशा मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांचेकडे देण्यात आले.
यावेळी वडगाव मावळ तालुक्याचे जेष्ठ नेते बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापुसाहेब भेगडे, ज्येष्ठ नेते अशोक बाफना, जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले, तळेगाव नगरपालिकेचे नगरसेवक किशोर भेगडे, नगरसेवकसंतोष भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्याध्यक्ष संतोष मुर्‍हे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभा कदम, तळेगाव नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा माया भेगडे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष सुनील दाभाडे, ग्रामीण अध्यक्ष कैलास गायकवाड, तळेगाव शहर राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश काकडे, देहुरोड शहर रा. कॉ. अध्यक्ष कृष्णाजी दाभोळे, लोणावळा शहर रा.कॉ. अध्यक्ष जीवन गायकवाड, तळेगाव शहर महिला अध्यक्ष सुनीता काळोखे व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.