पेट्रोल पंपासमोर वृध्दाने स्वत:ला घेतले जाळून

0

जळगाव – तालुक्यातील खेडी येथील 90 वर्षीय वृध्दाने पेट्रालपंपाजवळ स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना बुधवारी
सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून
मिळालेली माहिती अशी की, पांडूरंग गणपत वरणकर (वय-90) रा. खेडी बु|| ता.जळगाव हे राहत्या घरून खेडी येथील पेट्रोल पंपाजवळ
मुलाचे वेफरचे दुकानावर त्याठिकाणी गेले. थोडावेळ थांबल्यानंतर पेट्रोल पंपाजवळील गंगा जमूना हॉटेल स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून
पेटवून घेतले यात ते 90 टक्के जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मात्र पेटवून घेण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या घटनेबाबत
एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.