कल्याण : पेट्रोल पंपावर अनेकदा पैसे दिल्या नंतरही कमी पेट्रोल भरल्याचा आरोप करण्यात येतो .पेट्रोल पंप वर काम करणारे कर्मचारी ग्राहकाचे लक्ष नसल्याची संधी उचलत रिडींग शून्य न करता ग्राहकांची फसवनुक करतात .असाच प्रकार कल्याणात उघडकीस आला आहे.
कल्याण पश्चिम कडील संतोषी माता रोड पदमावती जैन सोसायटी मध्ये राहणारे अजित ओसवाल काल दुपारी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास पेट्रोल भरण्यासाठी आपली गाडी घेऊन डी मार्ट समोरील पेट्रोल पंपावर आले पंपावर हजार देऊन त्यांना पेट्रोल भरण्यास सांगितले, मात्र सदर कर्मचाऱ्याने रिडींग शून्य करता पेट्रोल भरले त्याने पेट्रोल कमी भरल्याचा संशय आल्याने अजित यांनी या कर्मचाऱ्याला जाब विचारला व या बाबत बाजरपेठ पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली हा तक्रारी नुसार पोलिसांनी तपास केला असता 1000 रुपयात 13 लिटर 500 मिली पेट्रोल भरणे आवश्यक असताना प्रत्यक्षात या कर्मचाऱ्याने 9 लिटर 500 मिली पेट्रोल भरत चार लिटर पेट्रोल कमी भरल्याचे लक्षात आले. त्यामुळे या प्रकरणी पोलिसांनी पंकज शर्मा या पेट्रोल पंप कर्मचाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.