सामान्यांच्या खिशाला कात्री
नवी दिल्ली । केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना पेट्रोल, डिझेल स्वस्त होईल, असा होरा व्यक्त करण्यात आला होता. मात्र दुसर्याच दिवशी त्याला छेद गेला आहे. शुक्रवारी पेट्रोलच्या दरात प्रति/लिटर 5 पैशांनी वाढ झाली आहे. ही नवी दरवाढ दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथे लागू करण्यात आली. मात्र, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता आणखी कात्री लागणार आहे.
पुणे, मुंबईत पेट्रोल 80.96 रूपये
ही नवी दरवाढ शुक्रवारी सकाळी सहावाजेपासून लागू करण्यात आली आहे. या नव्या दरवाढीनुसार राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 73.1 रूपये प्रतिलीटर, कोलकाता येथे 75.79 रुपये प्रतिलीटर, मुंबईत 80.96 रुपये प्रतिलीटर तर चेनईत 75.82 रुपये प्रतिलीटर असणार आहे.