पेण : पेण शहराला होणार्या अस्वच्छ व अपुर्या पाणी पुरवठ्याची जाणीव लक्षात घेऊन येत्या 15 ऑगस्टला पाणीपुरवठा टप्पा क्रमांक 2 च्या फिलटरेशन प्लँनचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री रवीशेठ पाटिल यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे शहराला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा प्रीतम पाटिल यांनी दिली. यापूर्वी च्या सत्ताधार्यांनी नगरपालिकेच्या पाणीपुरवठ्याचे साडेचार कोटी रुपये अर्बन बँकेत ठेवल्याने शहरातील पाणीपुरवठयाचा प्रश्न गंभीर झाला होता. पंरतु माजी मंत्री रवीशेठ पाटिल यांनी शासनाकडून काही निधी उपलब्ध करुन घेतल्याने क वर्ग असणार्या नगरपालिकेने शहराला शुध्द व स्वच्छ पाणीपुरवठा उपलब्ध केला आहे.
या अगोदर 6 एमएलटी पाणी पुरवठा उपलब्ध होत होता. परंतु आता 7 एमएलटीसह एकूण 13 एमएलटी पाणीपुरवठा शहराला उपलब्ध होणार असल्याचे सांगून या प्रकल्पाला साधारण 18 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. शहरात स्वच्छ पाणीपुरवठा होणार असून शहराच्या सर्वांगीण विकासाकरीता आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपनगराध्यक्ष दिपक गुरव, गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्ख्याधिकारी जीवन पाटिल, नगरसेविका तेजस्विनी नेने, शहनाज मुजावर, नगरसेवक दर्शन बाफना, राजा म्हात्रे, शहर अध्यक्ष भास्कर पाटिल आदी उपस्थित होते.