पेण : पेण येथील प्रतिष्ठेची मानली जाणारी पंचाहत्तर हजार रुपये रोख बक्षीस असलेल्या शिवसेना, युवासेना आयोजित गोपाळकाला उत्सवाच्या हंडीसाठी सात थर रचून रोशनी गावातील ओम साई गोविंदा पथक कोयना पुनर्वसन हे मानकरी ठरले आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना व युवासेने तर्फ पेण येथील गांधी मंदिर वाचनालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. या वेळी शिवसेनेचे सल्लागार व रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य किशोर जैन, उपजिल्हा प्रमुख नरेश गावंड, तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे , उपतालुका प्रमुख संतोष पाटील, पेण शहरप्रमुख ओमकार दानवे, युवासेना पेण तालुका अधिकारी चेतन मोकल, शहर अधिकारी प्रसाद देशमुख, माजी शहरप्रमुख अशोक वर्तक, विजय पाटील, महिला आघाडीच्या गिता म्हात्रे, दिपश्री पोटफोडे, वढाव ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता वर्तक, कांतिलाल म्हात्रे, हिराजी चौगुले, नरेश सोनवणे, राजू पाटील, विशाल दोशी, मयूर पाटील यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक, युवासैनिक व नागरीक उपस्थित होते.
या गोपाळकाला उत्सवात दहीहंडी फोडण्यासाठी 4 पथक सहभागी झाले होते. यामध्ये बाळ मित्र मंडळ गडब, जय हनुमान गोविंदा पथक कोलेटी, व जय हनुमान गोविंदा पथक अलिबाग यांनी प्रत्येकी सहा थर लाऊन सलामी दिली तर ॐसाई गोविंदा पथक कोयना पुनर्वसन यांनी सात थर लाऊन मानाची हंडी फोडली. यावेळी मार्गदर्शन करताना किशोर जैन म्हणाले सालाबाद प्रमाणे यावर्षीही शिवसेनेने हिंदू संस्कृतीचे जतन केले आहे. पुढील वर्षीही अधिक उत्साहाने आपण हा सण साजरा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.