पेन्शनधारकांना बँकेने सर्व सेवा पुरविण्याची मागणी

0

अमळनेर । जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्याची संख्या सुमारे 1 लाखाच्या वर आहे. पेंन्शन धारकांना राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र बचत खाते (सेव्हिंग अकाउंट) उघडण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे प्रत्येक पेन्शन धारकांनी राष्ट्रीयकृत बँकेत बचत खाते उघडले. त्या खात्यात इतरही व्यवहार होवू शकतात परंतु पेंन्शन धारकांना चेकबुक सह इतर बँकिंग सुविधा मिळत नाही. निवृत्त पेन्शन धारकांना बँकेने इतरपासून वंचित ठेवले असल्याने पेन्शन धारकांनी आमदार शिरीषदादा चौधरी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले.

शासनाच्या आदेशाच्या स्थापन झालेल्या बँकांची कार्यपद्धती निर्धारित कायद्याने संचलीत होत असते. बँकांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे जळगाव जिल्ह्यात सुमारे 1 लाख पेन्शन धारकांना बँकेत जाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. राज्यभरात पेन्शन धारकांना चेकबुक मिळते पण जळगांव जिल्ह्यात का मिळत नाही? असा प्रश्न पेंन्शन धारकांनी केला आहे. आमदार शिरीष चौधरी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व जिल्हाधिकारी जळगाव यांना पत्र दिले आहे. या संदर्भात राष्ट्रियकृत बँका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.