पेन्शन अदालतीत 253 तक्रारींचा निपटारा

0

भुसावळ। मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील सेवा निवृत्त कर्मचार्‍यांच्या तक्रारी संबधी 15 रोजी पेन्शन अदालतीचे आयोजन कृष्णचंद्र सभागृहात करण्यात आले. त्यात 253 तक्रारींचा निपटारा करण्यात येवून 23 लाख 69 हजार 522 रुपयांचे वितरण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
या पेन्शन अदालतीत न्यायाधिश म्हणून डीआरएम यादव होते. या कार्यक्रमाला पेन्शनर्स असोसिएशन भुसावळचे सचिव मंजुर अहमद, खजिनदार एन.आर. सरोदे, विभागीय वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक विजय कदम, कार्मिक अधिकारी आर.एन. गेडाम, विरेंद्र वडनेरे, एस.व्ही.ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तुशाबा शिंदे यांनी तर सुत्रसंचालन एन.एस. काझी यांनी केले.