55 लाख रकमेचे कर्मचार्यांना वाटप
भुसावळ : रेल्वेच्या पेन्शन अदालतीत शुक्रवारी तब्बल 259 तक्रारींचा निपटारा करण्यात आला तर कर्मचार्यांना तब्बल 55 लाख 11 हजार 526 रुपये रकमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. शहरातील श्रीकृष्णचंद्र सभागृहात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डीआरएम आर.के.यादव होते.