पेन्शन घेण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍याचे हृदयविकाराने निधन

0

यावल शहरातील दुर्दैवी घटना ; सेवानिवृत्ताची 20 हजारांची रोकड केली परत

यावल- पेन्शन घेण्यासाठी आलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍याला हृदयविकाराचा तीव्र झटक्याने मृत्यू झाला. वामन तुकाराम ठोंबरे (84, रा.डोंगरकठोरा) असे मृत इसमाचे नाव आहे. वामन ठोंबरे यांनी बँकेतून 22 हजार रुपये पेन्शन काढली. नंतर ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात औषधी घेण्याकरिता गेले असता मेडिकल स्टोअर्सजवळ त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ते जमिनीवर कोसळले. आजुबाजुच्या नागरीकांनी त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयांत हलवले परंतु त्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ.रश्मी पाटील मृत घोषित केले. ठोंबरे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.

असाही प्रामाणिकपणा..
वामन ठोंबरे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला तेव्हा शहरातील रहिवासी दिनेश क्षीरसागर हे मदतीला धावून गेले. ठोंबरे यांच्याकडे 20 हजार रुपयांची रोकड सापडली. त्यांनी ती आशीर्वाद इलेक्ट्रॉनिकच्या मालकांकडे सुपूर्द केली. नंतर ती रक्कम ठोंबरे यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आली.