पेन्शन दिंडीबाबत आमदार भोळे यांना निवेदन

0

जळगाव । महाराष्ट्र राज्या जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने आमदार राजूमामा भोळे यांना 2 ऑक्टोबर पासून राज्यात सुरू होणार्‍या पन्शन दिंडीबाबत निवेदन देण्यात आले. योवळी कृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियांची व्यथा संघटनेचे तालुकाध्यक्ष लोकेश पाटील व सुनिल ढाके यांनी आमदारांना सांगितली. आपल्या हक्काच्या जुनी पेन्शन योजनेसाठी मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री, वित्तमंत्री, पालकमंत्री यांना पाठिंबा व शिफारस पत्र आमदार भोळे यांना संघटनेतर्फे देण्यात आले आहे. यावेळी तालुक्यातील अध्यक्ष लोकेश पाटील , तालुकाउपाध्यक्ष प्रकाश बडगुजर, राजेश कोष्टी, सुनिल ढाके, प्रमोद रगरे, मनोज सुर्यवंशी, राजेश कुमावत, श्री. बंजारा आदी उपस्थित होते.