पेप्सी कंपनीच्या सीईओ इंदिरा नूयी यांचा राजीनामा

0

नवी दिल्ली-पेप्सी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) इंदिरा नूयी १२ वर्षांनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीकडून ही घोषणा करण्यात आली आहे. ६२ वर्षीय इंदिरा नूयी यांच्या जागी रेमन लॅगार्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते पेप्सी कंपनीचे सहावे सीईओ असतील.

पेप्सी कंपनीच्या त्या पहिल्या महिला सीईओ होत्या. येत्या ३ ऑक्टोबर रोजी त्यांचा कार्यकाळ संपणार आहे. गेल्या २४ वर्षांपासून त्या पेप्सी कंपनीशी निगडीत आहेत.

पेप्सिको कंपनीत काम करणे ही माझ्यासाठी आयुष्यातील अत्यंत अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. मला अभिमान आहे की, गेल्या १२ वर्षांत आम्ही फक्त भागधारकांसह सर्वांसाठी चांगली कामगिरी केली असल्याचे इंदिरा नूयी यांनी म्हटले आहे. रेमन लॅगार्ट हे मागील २२ वर्षांपासून पेप्सिको कंपनीत कार्यरत आहेत. त्यांनी कार्पोरेट स्ट्रॅटजी, पब्लिक पॉलिसी आदींमध्ये महत्वाची भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर त्यांनी कंपनीच्या यूरोप-आफ्रिका विभागाचे सीईओपदही सांभाळले आहे.