तर्हाडी । राज्यात सर्वत्र 10 जूनपर्यंत जोरदार पावसाचे सकेत आहेत. यामुळे लवकरच पेरण्या सुरु होतील अशी शक्यता गृहीत धरली जात आहे. एकीकडे शेतकर्यांची पेरणीसाठी लगबग सुरु असताना त्यांच्या हातात बियाणे, खते खरेदीसाठी पैसे नाहीत. मशागत पेरणीचे पैसे चुकवायचे कसे, असा पेच शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे. कर्जमाफी झालेल्यांनाही नवीन पीक कर्ज मिळालेले नाही. पावसाच्या आगमानामुळे या हंगामाची सुरुवात चांगली झाली आहे. येत्या 10 जूनपर्यंत मान्सुन सगळीकडे सक्रिय होण्याचा अंदाज असल्याने शेतकरी एकीकडे आनंदलेला असताना दुसरीकडे मात्र पेरणीला लागणारे बि-बियाणे खते खरेदीसाठी त्यांच्या हातात दमडीही नाही.
नवीन पिक कर्जासाठी बँकांचा हात आखडता
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्यांच्या खात्यात शासनाच्या रक्कम जमा झाल्या नसल्याने बँका नवीन पीककर्ज देताना हात आखडता घेत आहेत. काहीच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असली तरी कागदपत्रांच्या अडचणी, बँकामध्ये सर्व्हर डाऊन होणे, कर्मचार्यांच्या तुटवडा ही कारणे भोवत आहेत. असंख्य बँक शाखांमध्ये दिवसाला केवळ 10 ते 15 प्रकरणे हातावेगळी करत आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाखांमध्ये सध्या सर्वत्र गर्दी बघायला मिळते आहे. असंख्य शेतकर्यांना मिळालेली कर्जमाफी ही अजूनही त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. ज्याची माफी झाली त्यांच्या याद्याबांबत गोधळ आहे.
कर्ज मिळणार नाही…
कर्जमाफीनंतर काही राष्ट्रीयकृत बँकांनी मोठा चलाखी केली आहे. यापूर्वी ज्या शेतकर्यांना पीककर्ज वाटप केले आणि आता ज्यांना माफी मिळाली. अशांची खाती निल होऊन या हंगामासाठी नवीन कर्ज देण्यास नकार देत आहेत. आता तुमचे गाव आमच्या शाखेशी पीककर्जासाठी जोडलेले नाही. तुम्ही दुसर्या बँकेकडे अर्ज करा, असे सांगितले जाते. दुसरीकडे सुचविलेली बँक शाखाही आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही, असे सांगून मोकळ्या होत आहेत.