यावल। शहरातील बारीवाड्यात काही दिवसांपूर्वी पेव्हर ब्लॉकचे काम करण्यात आले होते. मात्र काही दिवसातच या ब्लॉकला मोठ्या प्रमाणावर तडा गेल्यामुळे या कामाची गुणवत्ता समोर आली होती. याप्रकरणी रहिवाशांकडून वाढलेला रोष पाहता मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता एस.ए.शेख यांनी कामाची पाहणी केली. यानंतर ठेकेदाराला नोटीस देत नव्याने काम करण्यास सांगण्यात आले.
बारीवाड्यात पेव्हर ब्लॉक बसवताना थातूरमातूर काम उरकले. अल्पवधीच अनेक ठिकाणी ब्लॉक उखडण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी ते उंच-सखल झाले आहेत. यामुळे त्यावरून वाहनेदेखील चालवता येत नाहीत. याबाबत दै. जनशक्तीने वृक्ष प्रकशित करुन या परिसरातील रहिवाशांचा संताप मांडला होता याची पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी जळगावच्या ठेकेदाराला नोटीस दिली असून कामाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.